Sunday, December 28, 2014

६. आकंठ, दिवाळी अंक २०१४

लोकसत्तामध्ये दिवाळी अंकांची जी माहिती येते त्यात असं म्हटलं होतं की यंदाचा 'आकंठ' चा अंक सिंधी साहित्य विशेषांक असणार आहे. खरं तर २-३ दुकानं धुंडाळूनही मला मिळाला नव्हता पण नेटाने चौकशी केल्यावर दीपोत्सवसोबत मिळाला. अंक हातात पडूनही वाचायला वेळ मिळत नव्हता. आणि मिळाला तेव्हा मात्र नाही म्हटलं तरी थोडीशी निराशाच झाली.

दुसर्या भाषेतल्या कथा वाचायच्या म्हणजे मूळ कथेची गोडी भाषांतरात न उतरण्याचा धोका असतोच. त्यामुळे ह्यातल्या बऱ्याच कथांतली भाषा कृत्रिम वाटते ह्यात नवल वाटण्यासारखे काही नव्हतं. नवल ह्या गोष्टीचं वाटलं की बऱ्याच कथा बेतलेल्या वाटल्या, खोट्या वाटल्या. कथा प्रसिद्ध झाल्या ते साल कुठेच नमूद केलेलं नसल्यामुळे त्या त्या काळाला अनुसरून त्या कथा होत्या का हेही कळायला मार्ग नाही. उदा. आईवडिलांकडे लक्ष न देणारा मुलगा ही कल्पना २-३ कथांत येते ती तेव्हाच्या काळात 'shocking' असली तरी आजच्या काळात सत्यपरिस्थिती आहे, वास्तव आहे - कितीही कटू असलं तरी. 

असो. मला आवडलेल्या कथा म्हणजे समंजस सासू, खानवांहण, श्रध्दा, दस्तावेज, बैल आणि भाषा, चुन्नू आणि मुन्नी आणि "सिंधी लोक आणि त्यांची संस्कृती" हा लेख. कविता हा माझा प्रांत नसला तरी त्या सदरातल्या काही कविता - विशेषत: फाळणीची, घरादाराला मुकल्याची भावना व्यक्त करणाऱ्या - मनाला स्पर्शून गेल्या.

त्यामुळेच पुढल्या वर्षी हा अंक आणायचा की नाही ते अजून ठरवता येत नाहिये हे नक्की.

No comments: