Saturday, March 8, 2014

कोल्हापूरी मिसळ

वन-डिश मील हवं होतं पण दाल बाटी करायची नव्हती म्हणून रेसिपीज लिहिलेल्या वह्या चाळल्या तेव्हा ही कृती मिळाली. मस्त झाली म्हणून पोस्ट करतेय.



साहित्य: ओलं खोबरं, शहाजिरं, लवंग, दालचिनी, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, तेल, हळद, कांदा (बारीक चिरून), टोमेटो (बारीक चिरून), मोड आलेली मटकी (शिजवलेली), शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी, मीठ, कोल्हापूरी कांदा लसूण मसाला, तिखट, चिवडा/फरसाण/मोठ्या गाठी, लिंबू, पाणी

कृती:

तेलावर ओलं खोबरं, शहाजिरं, लवंग, दालचिनी, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर परतून घ्या. मग त्याचं मिक्सरमधून वाटण करा.
तेल गरम करून त्यात हळद, आलं लसूण पेस्ट, मोड आलेली मटकी (शिजवलेली), शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी, मीठ घाला आणि परतून उसळ करा.

कट (रस्सा) करण्यासाठी - तेल (जास्त घ्या) गरम करा. त्यात हळद, कांदा (बारीक चिरून), टोमेटो (बारीक चिरून), कोल्हापूरी कांदा लसूण मसाला, तिखट घाला. परता. मग त्यात वाटण घाला. मीठ आणि पाणी घालून पातळ रस्सा करा.

खायला देताना प्लेटमध्ये तळाला मटकीची उसळ घाला. कांदा (बारीक चिरून) पसरा. त्यावर भरपूर कट (रस्सा) ओता. चिवडा/फरसाण/मोठ्या गाठी घाला. ओलं खोबरं, कोथिंबीर घाला. शेवटी लिंबू पिळा व ब्रेडच्या स्लाईसेससोबत सर्व्ह करा.

No comments: