Monday, January 6, 2014

केळ्याचं रायतं

माझ्या आवडत्या फळात केळ्याचा समावेश अजिबात होत नाही. खरं तर केळं हे फळ आहे हेच मला मान्य नाही. :-) त्यामुळे केळं घातलेला रव्याचा शिरा, केळ्याचं शिकरण आणि रायतं ह्या तीनच गोष्टी मी खाऊ शकते. तर केळ्याच्या रायत्याची ही रेसिपी:

केळ्याचे बारीक तुकडे करा.
दही फेटून घ्या. त्यात साखर, मीठ आणि थोडं ओलं खोबरं नीट मिक्स करून घ्या.
त्यात केळ्याचे तुकडे घाला.
तेल तापवून त्यात हिंग, जिरे आणि हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घाला.
ही फोडणी केळ्याच्या मिश्रणावर ओता.
कोथिंबीर घालून सर्व मिश्रण ढवळून घ्या.
फ्रीजमध्ये ठेवून गार सर्व्ह करा.

No comments: