Thursday, September 9, 2010

शांताबाई शेळक्यांनी अनुवादित केलेल्या गुलजार ह्यांच्या काही त्रिवेणी मला मेलमधून फॉरवर्ड होऊन आल्या. त्यातल्या मला अतिशय आवडलेल्या ह्या तीनः

उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहीले
किती तरी वेळ फांदी हात हालवत होती

निरोप घेन्यासाथी? की पुन्हा बोलावण्यासाठी?
-----

काय ठाउक कुठून घाव घालील अचानक
मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त!

मरणाचे काय? ते एकदाच मारून टाकते!
-----

रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात
रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची

हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते!

No comments: