Wednesday, April 14, 2010

ग्रामीण महाराष्ट्र पहायची तसं म्हटलं तर पहिलीच वेळ. मागल्या ट्रीपच्या वेळेस फार काही पाहिल्याचं आठवत नाही. ह्या वेळी मात्र हिरवी शेतं, तारांवर बसलेले ड्रॉन्गो, किंगफिशर, बुलबुल, टिटवी असे पक्षी, तरारून आलेले उस, डोलणारी कणसं, दुरून दिसणारे इटुकल्या देवळांचे कळस पोटभरून पाहिले. अर्थात भरून वाहणारी गटारं, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे ढीग, रिकामे बसलेले गावातले लोक, कशीतरी तग धरून उभी असलेली खोपटं हे पाहून मन विष्षण झालं. २०-२५ जणांचे १०-१२ गट झाले तर ही गावं साफ करायला वेळ लागणार नाही असं वाटून गेलं पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? :-(

असो. गाडी पार्क करायला जागा नाही म्हणून दगडू हलवाईच्या गणपतीचं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं ही एक खंत आहे :-( अष्टविनायक दर्शन तर झालं आता कोल्हापूरची अंबाबाई, पंढरीचा विठोबा-रखुमाई आणि वणीची सप्तश्रृंगीमाता कधी दर्शनाला बोलावतात पाहूया :-)

No comments: