Saturday, March 28, 2015

जुन्या काळातल्या गायिका कृष्णा कल्ले ह्यांच्या निधनाची बातमी वाचली तेव्हा गायिकेची ओळख पटेना. हे नाव मी कधीच ऐकलं नव्हतं. पण त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या यादीत काही जुनी ओळखीची गाणी सापडली तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटलं की गाणी माहीत असून गायिकेचं नाव आपल्याला कसं माहीत नव्हतं. ह्यातली काही गाणी तर ऐकून युगगं लोटल्यासारखी वाटतात. शाळकरी दिवसांत संध्याकाळी घरी आल्यावर आईने रेडिओवर लावलेल्या सांजधारा मध्ये ही गाणी लागायची - गोड गोजिरी लाज लाजरी, परिकथेतील राजकुमारा, पुनवेचा चंद्रमा आला घरी. मन खूप वर्षं मागे गेलं. आणि त्याच दिवशी लोकसत्तात http://www.aathavanitli-gani.com/ विषयी वाचलं. इथेही बरीच जुनी मराठी गाणी ऐकायला मिळतात. डाउनलोड करायची सोय मात्र सध्या तरी नाहीये. :-(

No comments: