Tuesday, November 8, 2011

हेपी बर्थडे पु.लं.

खरं सांगू का? तुम्ही आमच्यातून गेला आहात हे मला अजूनही खरंच वाटत नाहिये. कारण तुमच्या पुस्तकांच्या पानांपानांतून तुम्ही भेटत होतात, भेटत आहात आणि भेटत रहाल. घरापासून दूर परक्या देशात, परक्या लोकांत असताना तिथे रुळेपर्यंत तुमच्याच पुस्तकांनीच आधार दिला. खरं तर ती पुस्तकं अश्या काळातली जो काळ माझ्या पिढीने कधी पाहिलाच नाही. तरी तो आपला वाटत राहिला, नॊस्टेल्जिक करत राहिला. फ़्लॆट संस्कृतीत वाढलेल्या मला चाळीची ओळख तुमच्या बटाट्याच्या चाळीने करून दिली. "अरेरे! आपण चाळीत का वाढलो नाही" हे तेव्हाच्या वयात वाटायला लावायची किमया तुमच्याच लेखणीची. तुमच्या नंदा प्रधानाने रडवलं, पेस्तनकाकांनी हसवलं....आणि त्याच वेळी आयुष्य़ आयुष्य़ ज्याला म्हणतो त्याबद्दल बरंच काही शिकवलं. किती लिहू आणि काय लिहू? ही यादी न संपणारी आहे. तुमचं ऋण न फ़िटणारं आहे किंवा मला ते फ़ेडायचंच नाहिये म्हणा ना.

आता श्रीकांत मोघे तुमची ’वायावरची वरात’ घेऊन आलेत. हा प्रयोग पहायची आशा मलाही आहे. तुमच्याच भाषेत सांगायचं तर ’कधीकधी देवाजी कृपा करतो’, हो ना? बघू माझ्यावर कधी ही कृपा होते.

चला, मग भेटू यात पुन्हा तुमच्या पुस्तकांतून. आत्ता तुमच्या ’हॆपी बर्थढेंच्युयु’ साठी हे कॆडबरी सेलेब्रेशन्स माझ्याकडून :-)

No comments: