Monday, May 2, 2011

काल १ मे - महाराष्ट्र दिन. पण पेपर उघडल्यावर राजकारणी लोकांनी ’आम्ही यंव करणार, त्यंव करणार", "आमच्या सरकारने हे केलं, ते केलं" अशी तुणतुणी वाजवलेली दिसली. आणि मग काहीही वाचण्यातला रसच संपला. खरं तर मला वाचायचं होतं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल. शाळेतल्या इतिहासात ह्याबद्दल काही वाचल्याचं मुळीसुध्दा आठवत नाहिये. तसंही शाळेत शिकवलेलं काय आठवतंय म्हणा :-( पण एक हुतात्मा स्मारक सोडलं तर ह्या लढ्याबद्दल आपल्याला एक मराठी माणूस म्हणून काहीही माहिती नाही ह्याची लाज वाटते. आता इंटरनेटच्या शरणी जाण्याखेरीज पर्याय नाही. पाहू काय मिळतं का ते.

No comments: