Thursday, April 29, 2010

गर्जा महाराष्ट्र माझा!

येत्या १ मेला महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. हे राज्य झालं तेव्हाचा सविस्तर इतिहास मला माहित नसला तरी ह्या वर्षी तो मी माहित करून घेणारच. कारण राकट, कणखर आणि दगडांची असली तरी ही भूमी माझी आहे. ह्यात माझ्या संस्क्रृतीची नाळ घट्ट रुजली आहे. आनंदाने पायावर डोकं ठेवावं आणि दु:खात गार्‍हाणी घालावी अशी माझी दैवतं ह्याच मातीत उभी आहेत. इथलीच माती माझ्या नसानसात आहे आणि मी इथल्याच मातीत शेवटी मिसळणार आहे.

अष्टविनायकांच्या, भवानीमातेच्या, अंबाबाईच्या, विठ्ठ्ल-रखुमाईच्या माझ्या लाडक्या महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा!

No comments: