Saturday, June 7, 2014

कैरीचा टक्कू

आजकाल आंब्याचा मोसम असल्याने सगळ्या चेनेल्सवरच्या कुकिंग शोज मध्ये आंब्याचे पदार्थ दाखवायची साथ आलेय. बहुतेक पदार्थ 'आंब्यावरील अत्याचार' ह्या सदरात येत असले (उदा. कैरी मांचुरियन, आंबा भजी, आंब्याचे बटाटेवडे वगैरे) तरी एखाद दुसरा पदार्थ पारंपारिक असल्याने करून बघावासा वाटतो. त्यातलाच हा टक्कू. नाव विचित्र वाटलं तरी फारशी खटपट नसल्यामुळे करून पाहिला, आवडला म्हणून ही कृती:

कैरीची सालं काढून टाकून कैरी किसून घ्यायची. त्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ आणि गूळ घालायचा. तेल तापवून मोहरी, हिंग, हळद, तिखट ह्यांची फोडणी करायची व किसावर ओतायची. नीट मिक्स करून घ्यायचं.

जेवताना तोंडी लावायला आंबटगोड मस्त लागतो. परत कायरस किंवा छुंदा बनवण्यापेक्षा सोपा आणि झटपट. :-)

No comments: