Thursday, May 15, 2014

स्टार प्लसवरच्या 'महाभारत' मालिकेत कुरुक्षेत्राच्या युध्दाची नांदी झाल्यापासून बघायची थोडी टाळाटाळ करत होते. अगदी पहिल्याच लढाईत अभिमन्यू मरणार नाहीये हे माहीत असूनही. परवा काय चाललंय पाहू या तरी म्हणून लावून पाहिलं तर चक्क कृष्णजन्म दाखवत होते. अरेच्चा! पण कृष्ण तर चक्क मोठा होऊन अर्जुनाला गीतोपदेश करायचा प्रसंग लवकरच येणार आहे की मग हे काय मध्येच? एपिसोड पुढे सरकला तेव्हा लक्षात आलं की कृष्ण पांडवांच्या मुलांना स्वत:विषयी सांगतोय. ८० च्या दशकातल्या चोप्रांच्या महाभारतापासून २-३ वर्षांपूर्वीच्या 'द्वारकाधीश' मालिकेपर्यत इतक्या वेळा कृष्णजन्म पाहिलाय तरी मनाचं समाधान होतच नाही. मी खूप धार्मिक नाहीये तरी पण बाळाचे पाय लागल्यावर यमुनेचा पूर ओसरून पाणी दुभंगतं आणि वसुदेवाला बाळाला गोकुळात पोचवायची वाट मिळते हे पाहून नकळत डोळ्यात पाणी आलंच. तेव्हढा शेषनाग वेळेत आला असता तर बिचारा बाळकृष्ण एव्हढा भिजला नसता कालच्या एपिसोडमध्ये :-) काल कालियामर्दनाची कथा होती. आणि आज माझी आवडती गोवर्धन करंगळीवर तोलून इंद्राची खट्टी जिरवली त्याची गोष्ट. आता हे कथासूत्र चालू असेतो मात्र मी एकही एपिसोड चुकवणार नाही हे निश्चित :-)

No comments: