Tuesday, April 15, 2014

बोर्डरूम - अच्युत गोडबोले

'मुसाफिर' वाचल्यानंतर गोडबोलेंची आणखी काही पुस्तकं वाचायची असं ठरवलं होतं. 'बोर्डरूम' हे त्यातलं पहिलं. Google, Apple, Microsoft, Amazon, Proctor & Gamble, Colgate, Kellogg's, GE, Ford ह्या आणि अश्या नानाविध कंपन्यांची सुरुवात कशी झाली, त्यांचे प्रवर्तक कोण होते, त्यांना काय काय अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली ह्याच्या एकाहून एक सुरस कथा ह्यात वाचायला मिळतात. तसंच मेनेजमेंटच्या अनेक थिअरीजबद्दलही बरीच माहिती मिळते. तसं बघायला गेलं तर ह्यातली सर्व माहिती नेटवर मिळू शकते. हे पुस्तक काही वर्षांपूर्वीचं असल्याने ह्यातले संदर्भ जुनेही झालेत. तरी पण मुद्दाम ठरवून नेटवर अशी माहिती मिळवायला कितपत आणि किती जणांना जमेल? त्यापेक्षा रेडी-टू-इट डिनर सारखा पुस्तकाचा हा पर्याय योग्य आहे. :-)

भारतात उद्योजक बनत नाहीत अशी ओरड नेहमीच ऐकायला येते. पण उद्योजक बनायला काय गुण लागतात हे जाणून घ्यायला आणि आपल्या नेहमीच्या वापरातल्या अनेक वस्तू ज्या कंपन्या बनवतात त्यांची कहाणी वाचायला हे पुस्तक वाचायला हवंच.

No comments: