Wednesday, December 4, 2013

धनंजय - दिवाळी अंक २०१३

ही पोस्ट इतक्या उशिरा टाकायचं कारण म्हणजे दिवाळीनंतरच्या आठवड्यात घेतलेला धनंजय ह्या शनिवारी रात्री वाचून संपला. ३ शब्दांत सांगायचं तर "फुल्टू पैसा वसूल'! गुढकथा, रहस्यकथा, भयकथा ज्यांना आवडतात त्यांनी आवर्जून वाचावा असाच हा अंक आहे. जवळजवळ सर्वच कथा छान आहेत त्यामुळे प्रत्येक कथेचा उल्लेख करायचा म्हटलं तर ही पोस्टच १ पान भरून होईल. पण एव्हढा सुरेख दिवाळी अंक वाचकांपर्यंत आणण्यात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. दर दिवाळीला धनंजयचा अंक गुढकथावर असतो का नाही ह्याची मला कल्पना नाही पण तसं असेल तर प्रत्येक दिवाळीला मी खरेदी केलेला पहिला अंक धनंजयचाच असेल हे नक्की. :-)

No comments: