Thursday, October 27, 2011

एका मित्राने फ़ॊरवर्ड केलेलं काही.....

मैत्रीचे कट्टे आजकाल ओस पडतात
कोणी ऒर्कूटवर तर कोणी फ़ेसबुकवर जमतात
प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात
कारण सगळे विषय चॆटवरच संपलेले असतात
मग चॆटवरच भेटू असं प्रॊमिस होतं
आणि संभाषणातून साईनआऊट केलं जातं

ऎव्हेलेबल आणि बिझी मधे प्रत्येकाचा स्टेट्स घुटमळत रहातो
आपणहून ऎड केलेल्या मित्रापासून लपण्याकरता इनव्हिजिबलचा आडोसा घेतला जातो
ताप आल्याचं आजकाल आईच्या आधी फ़ेसबुकला कळतं
औषधापेक्षा टेक केयर च्या डोसनेच तापालाही पळायला होतं

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं
चॆटला गप्पांनी आणि स्माईलीला हास्यानी रिप्लेस करावं
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं

चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा अनुभवू या
मैत्रीला टेक्नॊलीजीपासून जपून ठेवू या

No comments: