Monday, July 25, 2011

आजकाल माझं एफ़एम ऐकणं जवळपास बंदच झालंय. सोनीचा वॊकमन एव्हढा वापरतेय की एखाद दिवस तो नक्की संपावर जाणार ह्याची खात्री आहे :-) खरं तर ८जीबीचा घ्यायला हवा होता. पण आपल्याला आवडणारी एव्हढी गाणी आहेत हे मला कुठे माहित होतं? :-( तरी अजून त्यात मराठी गाणी लोड केलेलीच नाहियेत. आशा भोसलेंची माझी एक लाडकी सीडी कुठेतरी गायब झाली आहे. किती दिवस शोधतेय पण सापडतच नाही. माझी खूप आवडती अशी बरीच भावगीतं त्यात आहेत आणि मला ती वॊकमनमध्ये लोड करता येतात का ते पहायचंय. आज संध्याकाळी पुन्हा शोधतेच.

काहीकाही हिंदी गाण्यांची तर पारायणं झाली आहेत आणि दररोज होतात. ’अभिनेत्री’ मधलं ’ओ घटा सावरी’, ’मेरा साया’ मधलं ’तू जहा जहा चलेगा’, ’हिंदुस्तानकी कसम’ मधलं ’है तेरे साथ मेरी वफ़ा’, ’कुदरत’चं ’दुखसुखकी हरेक माला’, ’लिबास’मधली ३ गाणी, ’नमकीन’मधलं ’फ़िरसे आईयो बदरा बिदेसी’, ’मिलाप’ मधलं ’कई सदियोंसे कई जन्मोंसे’......

पूर्वीच्या काळचे इजिप्तचे राजे मेल्यावर आपल्या आवडीच्या वस्तू स्वत:सोबत पिरेमिडमध्ये पुरून घेत म्हणे. हिंदू धर्मात पुरायची सोय नाही म्हणून नाहीतर मी माझा सोनीचा वॊकमन आणि आवडीची पुस्तकं बरोबर घेऊन गेले असते. :-)

अरे हो, ९८.३ मिरची चॆनेलवरच्या पुरानी जीन्सचा अनमोल परत आलाय. त्याच्याऐवजी हा कार्यक्रम सादर करणारी आरजे चांगली होती पण अनमोलची सवय झाली होती. आणि सवय कुठे सहजासहजी बदलता येते? सो अनमोल, वेलकम बॆक. :-)

No comments: