Friday, June 25, 2010

मराठी नाटक पाहून किती दिवस झाले असं वाटतंय. गिरिश ओक अभिनीत "तो मी नव्हेच" ची जाहिरात वाचून मी जाम खूश झाले होते. पण एकदम ती जाहिरात गायब झाली. मग पेपरात वाचलं की ते नाटकाच्या दौर्‍यासाठी परदेशी गेलेत. आता त्यांच्या "यु टर्न" ह्या नाटकाच्या जाहिराती पुन्हा दिसू लागल्या आहेत. त्यामुळे मी आतुरतेने "तो मी नव्हेच" च्या जाहिरातींची वाट पहातेय. ह्या नाटकाबद्दल खूप ऐकलंय - अर्थात ते जुन्या नटसंचातल्या नाटकाबद्दल. पण नव्या नटसंचात पहायला मिळतंय हेही नसे थोडके. पाहू केव्हा योग येतो ते.

तुम्हीही नाटकाचे चहाते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुशखबर. सुनील बर्वे जुनी गाजलेली नाटकं नव्या नटांना घेऊन काढतोय. पहिलं नाटक येतंय ते सूर्याची पिल्लं. अधिक माहितीसाठी लोकसत्तातली ही बातमी वाचा - जुनी नाटकं नवे कलाकार.

No comments: