आजकाल रस्त्यावरून चालताना चिडायची अजिबात सोय उरलेली नाही. कोपऱ्या-कोपऱ्यावर भक्तांच्या घरी जायला तयार असलेले बाप्पा आलेले आहेत. आज संध्याकाळी घरी येताना बाप्पांच्या मूर्तीकडे पाहू का रस्त्यावरच्या गाड्यांकडे लक्ष ठेवू असं मला झालं. मोबाईल bagpack मध्ये होता म्हणून फोटो काढता आले नाहीत. एक मूर्ती तर खुपच सुंदर आहे. बालकृष्णाच्या रूपातला बाप्पा जवळच्या मातीच्या मडक्यातून मूठभरून लोणी घेऊन खाताना भारी गोजिरवाणा दिसत होता. कृष्ण आणि गणपती ही माझी दोन आराध्य दैवतं एकाच मूर्तीत. क्या बात है! मोगेम्बो खुश हुआ :-)
No comments:
Post a Comment