मराठी नाटकं शनिवार-रविवारी सुध्दा दुपारी ४-४:३० वाजता का असतात ह्याचं उत्तर कोणाकडे आहे काय? नाटक बघायची कितीही इच्छा असली तरी भरभर जेवून डोळ्यांवर झोप येत असताना धावतपळत नाट्यगृहाकडे जायचं ही कल्पनाच मला असह्य होते. सोमवार ते शुक्रवार धावपळीत गेल्यावर निदान विकेन्डला तरी सावकाश जेवून दुपारी आरामात झोप काढून मग मस्त गरमगरम चहा घेऊन ६-६:३० वाजता एखादं सुरेख नाटक बघायला जावं असं वाटणारी मी एकटीच आहे की काय? :-(
No comments:
Post a Comment