आज बाप्पा गावाला चाललेत। ऑफिसच्या जवळ गेले १० दिवस सतत दिसत असलेला गणपती उद्या दिसणार नाही ही कल्पनाच असह्य होतेय। १० दिवस कसे गेले कळलच नाही। दरवर्षी आमचं असंच होतं हो बाप्पा। तुम्ही येता, दहा दिवस राहता आणि मग तुम्ही निघून गेलात की सगळं ओकंबोकं वाटायला लागतं। तुमची साजिरी मूर्ति डॉळयासमोरून हालत नाही, कानात आरतीचे सुर घुमत रहातात, उदाधुपाचा मंडपातला सुवास जाणवत रहातो, कश्याकश्यात लक्ष लागत नाही।
आता पुढल्या वर्षीची वाट पहायची। लवकर याल ना?
No comments:
Post a Comment