Welcome to Swapna's World! I might not update this daily but when I do I will try to post something interesting or thought-provoking. Whether you like my postings or not, do post your comments. Bouquets and brickbats both are welcome :-) So happy reading and take care of yourself!
Thursday, May 15, 2014
स्टार प्लसवरच्या 'महाभारत' मालिकेत कुरुक्षेत्राच्या युध्दाची नांदी झाल्यापासून बघायची थोडी टाळाटाळ करत होते. अगदी पहिल्याच लढाईत अभिमन्यू मरणार नाहीये हे माहीत असूनही. परवा काय चाललंय पाहू या तरी म्हणून लावून पाहिलं तर चक्क कृष्णजन्म दाखवत होते. अरेच्चा! पण कृष्ण तर चक्क मोठा होऊन अर्जुनाला गीतोपदेश करायचा प्रसंग लवकरच येणार आहे की मग हे काय मध्येच? एपिसोड पुढे सरकला तेव्हा लक्षात आलं की कृष्ण पांडवांच्या मुलांना स्वत:विषयी सांगतोय. ८० च्या दशकातल्या चोप्रांच्या महाभारतापासून २-३ वर्षांपूर्वीच्या 'द्वारकाधीश' मालिकेपर्यत इतक्या वेळा कृष्णजन्म पाहिलाय तरी मनाचं समाधान होतच नाही. मी खूप धार्मिक नाहीये तरी पण बाळाचे पाय लागल्यावर यमुनेचा पूर ओसरून पाणी दुभंगतं आणि वसुदेवाला बाळाला गोकुळात पोचवायची वाट मिळते हे पाहून नकळत डोळ्यात पाणी आलंच. तेव्हढा शेषनाग वेळेत आला असता तर बिचारा बाळकृष्ण एव्हढा भिजला नसता कालच्या एपिसोडमध्ये :-) काल कालियामर्दनाची कथा होती. आणि आज माझी आवडती गोवर्धन करंगळीवर तोलून इंद्राची खट्टी जिरवली त्याची गोष्ट. आता हे कथासूत्र चालू असेतो मात्र मी एकही एपिसोड चुकवणार नाही हे निश्चित :-)
पांडगो इलो रे बा इलो
बऱ्याच दिवसांपासून हे नाटक पहायचं मनात होतं तरी शिवाजी, यशवंत किंवा रविंद्र यातल्या एकाही ठिकाणाची प्रयोगाची वेळ सोयीची नव्हती. पण काही दिवसांपूर्वी नाटकाच्या जाहिरातीत "शेवटचे ३ प्रयोग" असं वाचलं आणि वेळ सोयीची असो वा नसो पण जाऊन पहायचंच असं ठरवलं. १ मे ला यशवंतला दुपारी ४ चा प्रयोग आहे हे मला तिकीटविक्री सुरु झाल्या दिवशी संध्याकाळी कळलं. दुसरया दिवशी संध्याकाळी धावत धावत गेले तोवर पुढल्या किमान ७-८ रांगा तरी भरून गेलेल्या होत्या. यशवंत मध्ये तोपर्यंत एकाही नाटकं पाहिलं नसल्याने बसायची सोय कशी आहे ते माहीत नव्हतं. शिवाजी जुनं असल्याने त्यातल्या रांगा एकाच उंचीवर आहेत. समोर एखादी उंच व्यक्ती आली की संपलंच. त्यामानाने रविंद्र मध्ये प्रत्येक रांग पुढल्या रांगेपेक्षा उंच असल्याने हा त्रास नाही. शेवटी 'गणपतीबाप्पा मोरया' म्हटलं आणि तिकीट घेऊन आले.
१ मे ला दुपारच्या रणरणत्या उन्हात बाहेर पडायला असेल नसेल तेव्हढी सगळी इच्छाशक्ती एकवटावी लागली. नाट्यगृहावर पोचले तर सगळे लोक बाहेर घाम पुसत उभे. पण १०-१५ मिनिटांत आत सोडायला सुरुवात झाली. 'खाद्यपदार्थ किंवा पाण्याच्या बाटल्या आत नेऊ नका' ही सूचना लिहिलेली होतीच. खाद्यपदार्थांचं ठीक आहे पण ह्या उन्हाळ्यात पाणी आत न्यायचं नाही म्हणजे अन्याय आहे खरंच - नाट्यगृह एसी असलं तरी. आम्ही काय आत पाण्याने रंगपंचमी खेळणार आहोत का? असो. शिवाजी आणि रवींद्रला सुध्दा ही सूचना पहिली असल्याने मी पाणी नेलंच नव्हतं. त्यामुळे प्रश्नच नव्हता.
आत जाऊन बसले तरी घंटा काही होईना. अगदी ४:३० व्हायला आले तरी. बरोबर पुस्तक नेलं होतं त्यामुळे लोकांच्या तोंडाकडे पाहायची वेळ आली नाही तरी नाटक् उशिरा सुरु झालं म्हणजे उशिरा संपणार आणि बाकी वेळापत्रक कोलमडणार हे नक्की. आलिया भोगासी असावे सादर.....
शेवटी एकदाच्या तिन्ही घंटा झाल्या आणि 'मोबाईल बंद ठेवा' ह्या नेहेमीच्या सूचनेनंतर नाटक सुरु झालं. नाटकाचं बीज तसं तुम्हा आम्हा सर्वांच्या ओळखीचं. पण थोडंसं कालबाह्यसुध्दा झालेलं. ९ ते ५ नोकरी करणारा सरकारी चाकरमानी एके दिवशी रिटायर होतो आणि आता राहिलेत ते दिवस कुटुंबासोबत समाधानाने घालवायचे असे बेत करतो. पण लवकरच त्याच्या लक्षात येतं की आता घरात त्याला पूर्वीचं स्थान नाही. बायको सुनेला मदतीला घेऊन घरच्या कामात गुंतलेली. मुलगा नोकरीच्या व्यापात. ह्याने नुसता चहा मागितला तरी घरच्यांना कटकट होते कारण त्याची मदत अशी काहीच नाही - ना घर चालवायला ना घरकामाला. मग हळूहळू सून 'बसलाच आहात तर तांदूळ तरी निवडून दया' म्हणून आणून देते. बायको क्षुल्लक कारणावरून भांडण उकरून काढते. आणि शांततेने जगायचे ह्याचे बेत कुठल्या कुठे विरून जातात.
ह्या नाटकाचे नायक तात्या सावंत हे ह्याच चाकरमान्याचं प्रतिनिधित्त्व करतात. त्यातून त्यांना मटक्याचा नाद. मुलाच्या पाकिटातून पैसे काढतात. ते घरच्यांच्या लक्षात येतं आणि तिरमिरीत ते रात्री अपरात्री घर सोडून बाहेर पडतात ते शिवाजीपार्कच्या स्मशानभूमीजवळ पोचतात. इथे त्यांना भेटतो पांडुरंग उर्फ पांडग्या. खरं तर पांडग्याचं भूत. कारण तो आता ह्या जगात देहाने नसतो. पण काही इच्छा अपूर्ण राहिल्याने त्याचा आत्मा मात्र इथे भटकत असतो. पांडग्या तात्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं आश्वासन देतो. अट एकच तात्याने त्याला त्यांच्या घरी न्यायचं. आणि श्रावणात त्याच्या अपुऱ्या राहिलेल्या काही इच्छा पूर्ण करून द्यायच्या. अर्थात तो तात्यांशिवाय दुसर्या कोणालाच दिसणार नसल्याने घरच्यांना काही कळायचा प्रश्नच नसतो. तात्या आधी त्याला विरोध करतात पण मग बायको आणि मुलाला काटशह देता येईल ह्या विचाराने तयार होतात. पांडग्याने मदत केल्यामुळे तात्यांची घरी, आणि दारीसुध्दा, वट वाढते. यथावकाश श्रावण येतो आणि मग पांडग्याच्या एकेक इच्छा ऐकल्यावर 'घी देखा पर बडगा नही देखा' ह्या म्हणीची आठवण होऊन तात्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. तात्या पांडग्यापासून सुटका करून घेतात का पांडग्याच्या इच्छा पूर्ण होऊन त्याला मुक्ती मिळते हे पाहायला हे नाटक पुन्हा रंगभूमीवर यायची वाट तुम्हाला पहावी लागेल. कारण सध्यातरी ह्याचे प्रयोग नाहीत.
मी सुरुवातीला हे नाटक थोडंसं कालबाह्य झालंय असं म्हटलं कारण आजकाल बहुतेक घरातून नवरा बायको दोघेही काम करतात. त्यामुळे रिटायर्ड झाले तरी त्यांना आपापलं फ्रेंड सर्कल असण्याचे चान्सेस जास्त आहेत. घरात घरकामाला नोकर माणसं असतात. मुलं आईवडीलापासून दूर राहत असतात. आताची सिनियर सिटीझन पिढी ही कदाचित ह्या नाटकात दाखवलेल्या तात्या आणि त्यांच्या बायकोच्या पठडीत बसणारी शेवटची पिढी असावी. अर्थात हे नाटक घडतं ते एका चाळीत. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाना लागणारे सर्वच निकष इथे लागू पडत नाहीत हेही सत्य आहे.
नाटक मालवणीत असल्याने भाषा समजेल की नाही ही एक भीती होती. कारण 'तुका-माका' ह्या पलीकडे ह्या भाषेचं ज्ञान मला नाही. काही अपवाद सोडले तर तशी विशेष अडचण आली नाही. तात्या झालेले वैभव मांगले म्हणजे सिम्पली रॉकींग! आधीचा बायकोच्या मुठीतला नवरा आणि नंतर पांडग्याचं पाठबळ मिळाल्यावर त्याच्यात झालेला बदल त्यांनी मस्त दाखवलाय. फक्त काही प्रसंगात मालवणी संवाद खालच्या पट्टीत आणि घाईघाईने म्हटल्याने निदान मला तरी कळले नाहीत. नाटक बघायला येणारे सर्व प्रेक्षक मालवणीच आहेत असं गृहीत न धरता संवाद म्हटले तर बरं होईल. त्यांची बायको उर्फ 'कमिश्नर' ह्या भूमिकेत लीना भागवत चोख बसल्या आहेत. मला त्यांचा अभिनय नेहमीच आवडतो. तिसरा आवर्जून उल्लेख 'बाबी' झालेल्या अंशुमन विचारेंचा करावासा वाटतो. पांडग्याने धरल्यावर एका क्षणी पांडग्या आणि दुसऱ्याच क्षणी बाबी असा अभिनय त्यांनी अफलातून केलाय. 'तू तिथे मी' फेम चिन्मय मांडलेकर पांडग्या झाले होते. त्या मालिकेपेक्षा नाटकात त्यांनी बरा अभिनय केला असावा असं वाटतं. पण त्यातला बराचसा भाग स्टेजवर उड्या मारण्याचा असल्याने आणि चेहेऱ्यावर बऱ्याच झिपऱ्या असल्याने मी ठामपणे काही सांगू शकत नाही. :-) बाकी कलाकारांनी सुध्दा छान साथ दिली आहे. चाळीतल्या खोलीचं नेपथ्य छान होतं.
फक्त गुलाब, तिची लावणी आणि त्या अनुषंगाने येणारे काही संवाद आणि प्रसंग थोडे अस्थानी वाटले. त्यामुळे सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांना पाहाता येईल असं हे नाटक होऊ शकत नाही. 'आई' वरून दिलेली एखाद-दुसरी शिवी 'चलता है' ह्या सदरात टाकली तरी तिचा वापर उगाचच सारखा सारखा झाला तर चांगलाच खटकतो.
तेव्हढ सोडलं तर दुपारच्या झोपेवर पाणी सोडून उन्हाने घामाघूम होत नाटक पहायला गेल्याचं चीज झालं असंच मी म्हणेन.

Tuesday, May 13, 2014
यळकोट यळकोट जय मल्हार
'तू तिथे मी' नामक महाभयंकर पिळवणूक १७ मे ला संपतेय ह्यावर विश्वासच बसत नाहीये. मला तर भीती वाटत होती की प्रिया, मंजिरी आणि त्यांच्या मुलींची गोष्ट एकता कपूरच्या 'कुसुम' ह्या सिरीयलीच्या वाटेने जाणार आणि प्रेक्षकांची वाट लावणार. ज्या कोण्या व्यक्तीने ही पिळवणूक थांबवली त्याला/तिला माझे शतश: धन्यवाद. मी वाट बघतेय ती १८ मे च्या संध्याकाळी ७ वाजताच्या ह्या स्लॉटवर सुरु होणार्या नव्या मालिकेची. मालिकेचं नाव आहे 'यळकोट यळकोट जय मल्हार'. अगदी प्रथम मालिकेबद्दल ऐकलं/वाचलं तेव्हा नेहमीचीच सास-बहु इस्टोरी आणि त्याला background म्हणून जेजुरीचा खंडोबा आहे की काय अशी भीती वाटत होती. पण नंतर वाचलं त्यानुसार आणि प्रोमोज बघून तरी असं वाटतंय की ही पौराणिक मालिकाच आहे. निदान माझ्या आठवणीप्रमाणे तरी झी मराठी वर सुरु होणारी ही पहिली पौराणिक मालिका असावी. अनेक वर्षापूर्वी अष्टविनायकांसोबत जेजुरीलाही जाऊन आल्याचं अंधुक आठवतंय. अंधुक अशासाठी की आम्ही तिथे रात्री पोचलो होतो आणि मी अर्धवट झोपेत होते. इथे हळदीचा भंडारा उधळला जातो एव्हढं ऐकून माहीत होतं. काही दिवसांपूर्वी ह्या भंडार्यात भेसळ असल्याने अनेक भक्तांना स्कीन एलर्जीचा त्रास होतो असंही वाचनात आलं होतं. खरं सांगायचं तर ह्यापलीकडे ह्या देवाविषयी मला काहीच माहिती नाही. म्हणून मालिकेबद्दल जास्त उत्सुकता वाटतेय.
प्रोमोजवरून निर्मितीमूल्य लाईफ ओके वरच्या 'देवोंके देव महादेव' सारखं असावं अशी आशा वाटतेय. काय ते कळेलच.